मामबो बोधचिन्ह
‘लेखकांची मांदियाळी’ म्हणजे मामबो.
आज आपण सगळे टंकलेखन जास्त करत असलो तरी लेखणीची निब ही लेखन परंपरेचं प्रतीक आहे. नाजूक नक्षीकाम असलेल्या पंचरंगी कमलदलातून आलेले निब दर्शवतेय मामबोकरांचे फुलणारे बहुआयामी, विविधरंगी समृद्ध लेखन. निबेवर उभे मामबो शब्द खास निळ्या शाईत दर्शवलेले आहेत.
दिवाळी अंक हा मामबोचा वार्षिक उपक्रम. कमळातून वर दिसणारी निब दुसऱ्या अंगाने दीपज्योती व पणतीचा आभास देते.
ज्योतीच्या प्रकाशवलयात मागे सामावलेली पृथ्वी मामबो हे वैश्विक कुटुंब आहे हेच सुचवते आहे. मराठी साहित्यशिरोमणी ज्ञानदेव माऊलींचे स्मरण यायोगे होणे स्वाभाविक आहे.
तमसो मा ज्योतिर्गमय… अंधार नष्ट करत तेवणारी पणती, दिवसा उजेडी तेजाचा वारसा सांगत स्फुरणारी इथली लेखनप्रभा अशा दोन्ही रूपांत साकारलेले मामबो बोधचिन्ह दिवाळी अंक २०२० समितीच्यावतीने आपल्यासमोर ठेवताना विशेष आनंद होत आहे.
या बोधचिन्हाची संकल्पना प्राजक्ता पाडगांवकर आणि सायली मोकाटे-जोग यांची असून रेखाटन, निर्मिती सायली मोकाटे-जोग यांनी केलेली आहे.
खूप विचार करून बोधाचीन्हाची निर्मिती केली आहे …सुरेख
खूप सुन्दर बोधचिन्ह! 👌🏻👌🏻👌🏻
समर्पक बोधचिन्ह, संकल्पना, रेखाटन अप्रतिम !
खूप सुंदर बोधचिन्ह !
अप्रतिम बोधचिन्ह
अतिशय सुंदर आणि कल्पक.👌👌👌
अप्रतिम आणि समर्पक बोधचिन्ह 👍
अतिशय सुंदर समर्पक , रेखीव बोधचिन्ह !
सुंदर संकल्पना
बोधचिन्ह खूप छान आहे