जीणेच व्यर्थ होते माझे तुझ्याविणा रे
शोधीत राहिले मी माझाच मीपणा रे
वाहून काळ गेला माझ्या तुझ्यातला रे
जाग्या मनात होत्या वाटेतल्या खुणा रे
आयुष्य मात्र गेले हातातुनी फुका रे
तेव्हाच जाणला मी माझा उणेपणा रे
सोडून बंध सारे येता तुझ्या समीप
नात्यात जाणला मी तो वेगळेपणा रे
माझ्यात पाहिले मी जेव्हा तुला पुन्हा रे
दोघात राहिला ना काही दुजेपणा रे