चालू होता प्रवास निर्धास्त मनाचा
पावलांना सराव होता त्या वाटेचा !
तुझ्यापर्यंत पोचणे हेच ध्येय होते
दृष्टीपुढे तुझे ते प्रिय चरण होते !
वाटेने चालताना तुझाच भास व्हावा
संगे पावलांना तुझाच पदरव यावा !
वळणावरच्या पाऊलखुणा ओळखीच्या
हळूच सांगती मार्ग तोच हा परतीचा !
वाटेवरती दरवळ तुझ्या मायेची होती
सुकर करी प्रवास आस लागली होती !
तुझ्या दर्शनाचा मनी भाव होता
तुझ्या पावलांचा मनी ठाव होता !
तुझे तुला अर्पून ही यात्रा व्हावी पूर्ण
सफलता ह्यातच मज जीवनाची संपूर्ण !!
छान कविता!