काळ्या करंद अंधारावर
लुक लुक दीपांची रांगोळी
शिर-शिर काटा मोडुन काढत
अभ्यंगाच्या घन आंघोळी !!
तना-मनाच्या आनंदाचा
तोल सावरित समीपताना
वस्त्रांची नव सळसळ गाते
भूपाळीच्या तेजस ताना!!
द्वैत मनाचे मिटून जावे
प्रेमभराने मिळता नजरा
समृद्धीच्या वरदानाने
दीपावलिचा झडतो मुजरा !!
वर्षभराचा शीण सरावा
गळून जावे दुःखांचे थर
आनंदाच्या लाटा झेलत
दीपांनी झगमगते झुंबर
छान कविता!